आत्मसन्मान
जन्म दिन आपल्या आणि आपल्या कुटुंबीयांच्या प्रत्येकाच्या आयुष्यातील एक सुंदर दिवस .असा दिवस जेव्हा एक स्त्री अपार वेदना सहन करुन "आई " रुपाने पुर्नजन्म घेते ,घरातील प्रत्येक जण एका नवीन नावाने आपल्याशी जोडले जातात. आपल्या वर निस्वार्थ प्रेम करणार्या प्रत्येकाच बोट पकडून आपली बाहेरच्या जगाशी ओळख होते आणि मग प्रत्येक जण शिक्षण, नोकरी, पैसे...ह्यामागे लागतो; आणि सगळ्यांतून जन्म घेतात ताण,तणाव, चिंता, एकटेपणा....
जस जन्म-मृत्यू एका धाग्याची दोन टोक आहेत तसेच बाकी सगळं त्या धाग्यातील गाठी/गुंता ज्याप्रत्येकाच्या आयुष्यात असतातच त्याला कोणीही अपवाद नाही. गरीब-श्रीमंत, अशिक्षीत-सुशिक्षित सगळ्यांना ह्या प्रसंगाना सामोरे जावे लागले.
पण ह्या सगळ्यावर मात करण्यासाठी **आत्महत्या** ??
टेन्शन,काळजी फक्त आपल्यालाच असते का?
जगातल्या प्रत्येक जीवाला ह्या संकटांना सामोरे जावे लागते ;मग त्यात प्राणी, पक्षी,झाड सगळे येतात; जरी त्यांना बोलता नाही आले तरी आपल्या पेक्षा जास्त त्रास आणि वेदना ते सहन करतात.पण तुम्ही अस कधी ऐकलंय का ह्या पैकी कोणी *आत्महत्या* केलीय ?
ते सगळे बिचारे आपल्यासाठी *आत्मत्याग* करतात.
ज्या माणसाला नीट बोलता - चालता येत ,सुशिक्षित आहे अश्या माणसाच्या डोक्यात हा विचार येणं म्हणजे आपल शिक्षण व्यर्थच!
आपल्या भारतात सुमारे एका दिवसात हजारो 18-30वयाची तरूण मंडळी आत्महत्या करतात. त्या खालोखाल 30-50 वयाची मंडळी.
तरूण मूलांन पासून ते शेतकरी,अभिनेते, वकील सगळ्या क्षेत्रातील लोक हे विकृत कृत्य करण्यास भाग पडतात.
मग लहान मुलांनी आदर्श म्हणून कोणाकडे बघायचे ??
ह्या कोरोनाच्या संकटात सगळ्यात जास्त आत्महत्याचे प्रमाण आहे. असे का??
ज्या कोरोनामुळे घराच्या भिंती बोलायला लागल्या , नात्यांतील मौन संपले , हरवलेले सार काही पुन्हा मिळालं , मग हे सगळ्या आपल्या संकटांना तोंड द्यायला पुरेसे नाहीय ...!!
आर्थिक मंदी,बेरोजगारी,शेतातील नुकसान ह्या सगळ्याच निवारण होऊ शकत ,सगळ परत मिळवता येईल पण *जीव* नाही !!
आरोग्य, आपली माणसं ,आपल कुटुंब ही प्रत्येकाची ताकद बनायला हवी आणि हेच कोरोनाने शिकवले.
नैराश्य, ताण वा काहीही असो आपल्या पालकांनाशी ,मित्र-मैत्रिणी बोलणे फार गरजेचे असते आणि हे जमत नसेल तर स्वताःच स्वताःशी बोलण योग्य. आत्महत्या करुन प्रश्न सुटणार??
आत्महत्या म्हणजे दुर्बल , कामचुकार असणं. ताण ,नैराश्य जे काही असेल ते सकारात्मक दृष्टीने पाहायला शिकले पाहिजे.
गरिबी, बेरोजगारी, नात्यांतील गुंते,कर्ज काहीही असो सगळं बदलू शकतं जर आपण जीवंत राहीलो तरच.
जन्म आणि मृत्यूचा दोर निसर्गाच्या हातात आहे,तो स्वताःच्या गळ्याला बांधण्याचे विकृत कृत्य करून आपण निसर्गाला दोषी ठरवतोय का??
जो निसर्ग आपल्याला क्षणा क्षणाला जगण्याचे धडे देतो तो दोषी कसा असेल!!
आत्मविश्वास आणि मेहनत आपल्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं देतील फक्त धीर सोडू नका.
आत्महत्या करुन प्रश्न सुटणार नाहीत कधीच.
आपल्या आयुष्याचा दिवा आपल्या पालकांनी पेटवलाय त्यात तेल पण तेच ओततात आणि वार्याची झुळूक आली तरी तेच ती अडवणार आपल्याला फक्त आपला प्रकाश त्यांना द्यायचा आहे.
आत्महत्याचा विचार करण्यापेक्षा आत्मपरीक्षण करा.
Nothing is precious than ur life......🙏


खूप सुंदर लेखन ते पण समर्पक शब्दात वर्णन
ReplyDeleteखूप सुदंर श्रेया
👌👌👌👌👌👌
तुझा पुढील लेखासाठी मी उत्सुक आहे .
छान अप्रतिम अशीच छान छान लिहीत जा
ReplyDeleteNice Dear😊👍
ReplyDeleteToo good👍👍
ReplyDeleteKeep it up 👍
खुप खुप छान😊keep it up 👍
ReplyDeleteSuperb ♨️
ReplyDeleteखूप सुंदर ✨️
ReplyDeleteGreat thought.. Everyone should think in such a realistic way.
ReplyDeleteखूप सुंदर लिहले
ReplyDeleteToo good
ReplyDeleteVery Nice 👍👍👍
ReplyDelete👍👌👌👌
ReplyDelete💯👍
ReplyDelete