आत्मसन्मान
जन्म दिन आपल्या आणि आपल्या कुटुंबीयांच्या प्रत्येकाच्या आयुष्यातील एक सुंदर दिवस .असा दिवस जेव्हा एक स्त्री अपार वेदना सहन करुन "आई " रुपाने पुर्नजन्म घेते ,घरातील प्रत्येक जण एका नवीन नावाने आपल्याशी जोडले जातात. आपल्या वर निस्वार्थ प्रेम करणार्या प्रत्येकाच बोट पकडून आपली बाहेरच्या जगाशी ओळख होते आणि मग प्रत्येक जण शिक्षण, नोकरी, पैसे...ह्यामागे लागतो; आणि सगळ्यांतून जन्म घेतात ताण,तणाव, चिंता, एकटेपणा.... जस जन्म-मृत्यू एका धाग्याची दोन टोक आहेत तसेच बाकी सगळं त्या धाग्यातील गाठी/गुंता ज्याप्रत्येकाच्या आयुष्यात असतातच त्याला कोणीही अपवाद नाही. गरीब-श्रीमंत, अशिक्षीत-सुशिक्षित सगळ्यांना ह्या प्रसंगाना सामोरे जावे लागले. पण ह्या सगळ्यावर मात करण्यासाठी **आत्महत्या** ?? टेन्शन,काळजी फक्त आपल्यालाच असते का? जगातल्या प्रत्येक जीवाला ह्या संकटांना सामोरे जावे लागते ;मग त्यात प्राणी, पक्षी,झाड सगळे येतात; जरी त्यांना बोलता नाही आले तरी आपल्या पेक्षा जा...